जयकरच्या माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा
रिपोर्ट - राहुल दाहोत्रे पुणे
पुणे दिनांक 30-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर अभ्यासिकेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मनोगत भोजन विद्यापीठ फेरफटका यासह विविध उपक्रमांकानी संपन्न झाला. यावेळी जुन्या आठवणींना उजाळाही देण्यात आला. अभ्यासिकेत अभ्यास करून शासकीय राजकीय शैक्षणिक सामाजिक वकील डॉक्टर व्यावसायिक उद्योजक आधी क्षेत्रात कार्यरत असलेले पन्नासहून अधिक मित्र अनेक वर्षानंतर एकत्र आले होते यावेळी सर्वांनी आपला थोडक्यात परिचय करून दिला. काही मान्यवरांनी आपले प्रेरणादायी अनुभव मांडले. अनेक जण भावनिक झाले होते. स्नेह मेळावा दरवर्षी आयोजित करावा अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली

Post a Comment