रिपोर्टर कल्याण से अजय जठार
ज्ञानेश्वर माऊली मंडळाच्या सौजन्याने विशाल पावशे फाउंडेशन व खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व आयुर हॉस्पिटल यांच्यामार्फत आरोग्य शिबिर तसेच पहिले ते दहावीपर्यंत शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले यामध्ये 1000 विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले तसेच तीनशे नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला या कार्यक्रमात नांदवली चिंचपाडा मनेरी गावातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
या कार्यक्रमाला उपस्थित माननीय नगरसेवक श्री विशाल पावशे व कल्याण जिल्हा संपर्कप्रमुख श्री विजय जोशी नांदवली गावची ज्येष्ठ समाजसेवक पंढरीनाथ ढोणे ज्ञानेश्वर माऊली मंडळाचे अध्यक्ष नवनाथ जरक मंडळातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते मान्यवर व परिसरातील जनतेने श्री नवनाथ यांचे या कार्याबद्दल खूप खूप कौतुक केले




Post a Comment