भिडे वाडा - जिल्हास्तरीय काव्य संमेलनासाठी जिल्हा स्तरावर बैठक संपन्न
रिपोर्टर देविदास महाजन भडगाव पाचोरा
"मी बोलताच त्याने हंबरडा फोडला,भिडेवाडा बोलला" भिडे वाड्याच्या मातीच्या ढिगार्यावर बसुन२०१४ साली कवी विजय वडवेराव यांनी ही कविता लिहिली.त्याच विषयावर७जुलै २०२४ त्यांनी पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर कवी संमेलन आयोजित केले त्यास देशांतून नव्हे तर परदेशातील कवी ही उपस्थित होते एकूण २२५ कवींनी काव्य सादरीकरण केले.
याच भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियान अंतर्गत रविवार दिनांक १/९/२०२४ रोजी आय एम आर काॅलेज जळगाव येथे सकाळी ९ते१पर्यत कवी संमेलन आयोजित केले आहे याच्या आयोजनासाठी आज पार पडलेल्या बैठकीत सर्व नियोजन ठरले असुन या कवी संमेलनात कवींच्या चहापान व भोजनाची ही व्यवस्था करण्यात येणार आहे.जिल्हयातील जास्तीत जास्त कवींनी उत्साहाने या संमेलनात सहभागी होऊन सावित्रीबाई यांच्या कामगिरी चा इतिहास प्रसाराचे कार्य करावे असे आवाहन 'जळगाव जिल्हा फुले वाडा कवी संमेलन नियोजन समिती ' मार्फत करण्यात आले आहे.या बैठकीत सुधीर महाजन,नंदा सोनवणे,आर जे सुरवाडे,ज्योती वाघ, अशोक पारधे,छाया सोनवणे,आशा सोनवणे, मुकुंदराव जाधव, गंगा सपकाळे, ईश्वर वाघ, ज्योती राणे, इंदिरा जाधव आदी कवी कवयित्री यांची उपस्थिती होती.
सदर कवी संमेलनासाठी भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव, जळगाव दै लोकमत मेनेजमेंट एक्झिक्युटिव्ह भावना शर्मा यांची उपस्थिती रहाणार आहेत

Post a Comment