लायन्स क्लब ऑफ पुणे गॅलक्सी च्या अध्यक्षपदी रेखा आखाडे.

 लायन्स क्लब ऑफ पुणे गॅलक्सी च्या अध्यक्षपदी रेखा आखाडे.

आइडियल इंडिया न्यूज़ 

राहुल दाहोत्रे पुणे 



पुणे - लायन्स क्लब ऑफ पुणे गॅलक्सी च्या 10 व्या पदग्रहण सोहळ्यात रेखा आखाडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

     लायन्स क्लब ऑफ पुणे गॅलक्सी चा पदग्रहण सोहळा नुकताच पुणे येथे पार पडला.प्रांत 3234डी -1 चे माजी प्रांतपल लायन अशोक मेहता यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ दिली.रेखा आखाडे यांना अध्यक्ष,तर किरण भालेराव यांना सचिव आणि कादंबरी वेदपाठक यांना खजिनदार पदाची शपथ दिली.यावेळी व्यासपीठावर माजी प्रांतपाल राजकुमार राठोड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच प्रथम उप प्रांतपाल राजेश अग्रवाल,झोन चेअर पर्सन मंदाकिनी माळवदे आदी उपस्थित होते.

         नूतन अध्यक्ष रेखा आखाडे यांनी आपल्या अध्यक्षीय कार्यकाळात तन,मन,धन समर्पित करून क्लब च्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने जास्तीत जास्त सेवा कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.नवीन अध्यक्षांच्या सेवा कार्याची सुरवात पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या सेवानी करण्यात आली.त्यामध्ये देवाची आळंदी येथील श्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील विध्यार्थ्यांना ड्रॉईंग किट चे वाटप करण्यात आले,वाघोली येथील अंधशाळेस धान्यवाटप करण्यात आले,एक राखी जवानांसाठी या उपक्रमांतर्गत सीमेवरील जावनांना पाठवण्यात येणाऱ्या राख्या आनंद सराफ यांच्या कडे सुपूर्द करण्यात आल्या.तसेच वेल्हे येथील ग्रामस्थांना विविध प्रकारच्या 200वृक्षांचे वाटप करण्यात आले.

        क्लब चे हे दहावे वर्ष असून दिनकर शिलेदार यांनी मनोगत व्यक्त करताना मागील कार्याचा आढावा घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र गुगळे यांनी केले.याप्रसंगी प्रांतातील अनेक मान्यवर,लायन सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन विजय रोडे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post