*भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेशाचा ओघ सुरूच...*
*महाविकास आघाडीला गावागावात पडत आहे खिंडार*
रिपोर्टर जिरेमाळी चाळीसगाव
चाळीसगाव - तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आमदार मंगेशदादा चव्हाण चव्हाण यांच्या नेतृत्वाला पसंती दिली जात आहे. गेल्या काही दिवसात तालुक्यातील हजारो महाविकास आघाडीच्या पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
आजदेखील महायुती सरकार तसेच चाळीसगाव तालुक्यात आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांच्या झंझावाताने प्रभावित होत मेहुनबारे, पोहरे तसेच घोडेगाव येथील उबाठा व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या उपस्थित भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे गावागावात महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात खिंडार पडत आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी भाजपा चा रुमाल गळ्यात टाकत सर्वांचे पक्षात स्वागत केले.




Post a Comment