श्रीराम BCA / BCS महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची विद्यापीठ संघात निवड*

 **श्रीराम BCA / BCS महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची  विद्यापीठ संघात निवड* 

संजय निंबालकर शोलापुर महाराष्ट्र        

       



       

 श्रीराम शिक्षण संस्था संचलित श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पानीव या महादिद्यालयातील कु.ननवरे नम्रता आप्पासो (बी.एस.सी.(ई सी.एस.) भाग-३) आणि कु.पांडुळे शितल महावीर  (बी.एस.सी.(ई सी.एस.) भाग-२) या विद्यार्थिनीची  पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्थरीय गोविंद गुरु ट्रिबल युनिव्हर्सिटी, बनस्वरा, राजस्थान येथे दि.16 डिसेंबर  ते 19 डिसेंबर 2024 दरम्यान होणाऱ्या खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

यासाठी क्रीडा शिक्षक सुखदेव घुले व संतोष वाघमोडे  यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .

या निवडी बद्दल संस्थेचे अध्यक्ष  प्रकाश पाटील, मार्गदर्शक श्रीलेखा पाटील , उपाध्यक्ष  करण पाटील ,सचिव ॲड.अभिषेक पाटील, सहसचिव डॉ.समीर पवार व  विशेष कार्यकारी अधिकारी  भाऊसो वनवे, महाविद्यालयाचे विभागप्रमुख राजेंद्र डावकरे व  सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post