*कर्ज नातवाचं ; मात्र मरण आजीचं*
-----------------------------------
कर्ज फेडण्यासाठी नातवाचे नातवाने केला आजीचा खून
-----------------------------------
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील घटना.--------------------
*पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी अवघ्या चार तासात खुनाचा आरोपी केला जेरबंद*
रिपोर्टर - आबासाहेब सुर्यवंशी
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर गावात एका ८० वर्षीय वृद्धेची हत्या करुन तिचा मृतदेह गोणपाटमध्ये भरुन ठेवला . ही घटना बुधवारी दि. १५ मे रोजी सायंकाळी उघडकीस आली होती. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी जळगाव स्थानिक शाखेच्या मदतीने अवघ्या ४ तासात गुन्ह्याचा तपास करून नातवाला अटक केली आहे. कर्ज फेडण्यासाठी आजी पैसे देत नसल्याने नातवानेच तिचा खून केला असल्याचे समोर आले आहे.
वीडियो न्यूज़
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवासी असलेल्या मांजाबाई दगडु भोई (वय ८०, रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा) असे मयत आजीचे नाव आहे. त्या आपल्या घरात एकट्याच राहत होत्या. बुधवारी दि. १५ मे रोजी सायंकाळी वृद्धेला कोणीतरी अज्ञात इसमाने तिचे घरात तिला जिवे ठार मारुन गोणपाटमध्ये बांधून ठेवले असल्याची गोपनीय माहिती पिंपळगाव पोलीस स्टेशनला दिली त्या नंतर पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आपल्या टीमला घटनास्थळी जावून पुढील तपास करणेबाबत आदेश दिले होते. गावात गोपनीय माहिती काढली असता मयत मांजाबाई हिचे बहिणीचा नातू विशाल भोई याने हे हत्येचे कृत्य केले असल्याची बातमी पथकाला मिळाली. पथकाने विशाल भोई याची माहिती घेतली असतातो पाचोरा येथे मयताचे प्रेतासोबत ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे गेला असल्याचे समजले.
त्यावरून पथकासह पिंपळगाव हरेश्वर येथून रणजीत पाटील, जितेंद्र पाटील, दिपक आहिरे यांनी पाचोरा येथून विशाल याला ताब्यात घेतले. विशाल प्रभाकर भाई, (वय २२, रा. पिंपळगाव हरेश्वर ता.पाचोरा) असे त्याने नाव सांगीतले पोलिसांनी विशाल भोई यास विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, माझ्यावर कर्ज झाले असल्याने कर्ज फेड करणेकरीता मी आजीकडून पैश्यांची मागणी केली होती. त्यावर आजीने मला नकार दिल्याने मी आजी मंजाबाई हिचा गळा दाबुन तिला जिवेठार मारले.
त्यानंतर तिचे हातातील चांदीचे गोटपाटल्यापैकी १ गोटपाटली व कानातील सोन्याच्या बाळया काढून घरात असलेल्या गोणपाटमध्ये भरुन तिथे घरात ठेवले. व मी मागच्या दरवाज्याने बाहेर निघुन मोटार सायकलने अजिंठा ता. अजिंठा जि.संभाजीनगर येथे जावून तिथे एका सोनार दुकानावर मोडून तिथून पैसे घेवून परत पिंपळगाव हरेश्वर येथे घरी आलो होतो, अशी गुन्ह्याची कबुली आहे. संशयीत विशाल प्रभाकर भोई यास गुन्ह्याचे पुढील तपासकामी पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे.चे ताब्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रणजित पाटील, जितू पाटील दिपक अहिरे, अभिजित निकम, पंकज सोनावणे, प्रशांत पाटील या पथकाने कामगिरी केली....

Post a Comment