*पाचोरा महाविद्यालयात ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन साजरा*
रिपोर्टर - आबासाहेब सुर्यवंशी
पाचोरा - येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा येथे दिनांक ६ जून गुरुवार रोजी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पाचोरा भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब दिलीप वाघ यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवराज्याभिषेक प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ व्हा.चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी संस्थेचे संचालक डॉ.जयंतराव पाटील वासू महाजन, डॉ. बी.एन पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले उपप्राचार्य डॉ.जे.व्ही . पाटील उप प्राचार्य प्रा. जी. बी. पाटील नितीन पाटील, ऋषिकेश ठाकूर महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. अतुल सूर्यवंशी यांनी तर आभार प्रा. डॉ. माणिक पाटील यांनी मानले.

Post a Comment