*महाराष्ट्राचा बदला घेणारा 'अनर्थसंकल्प*' :
सौ. वैशालीताई सुर्यवंशी
*(रिपोर्टर - आबा सुर्यवंशी)*
पाचोरा (जळगांव)- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि बिहार राज्यांसाठी केलेल्या आर्थिक तरतुदीचा तुलनात्मक अभ्यास केला असता मोदी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेचा लोकसभेच्या निकालाचा घेतलेला बदलाच आहे ! असेच म्हणावे लागेल. देशातील सर्व राज्यांमध्ये कराच्या माध्यामातुन सर्वाधिक महसुल महाराष्ट्र राज्यातून जमा होत असतो. असे असतांनाही केवळ आपले सरकार वाचविण्यासाठी बिहार व आंध्रप्रदेश या दोन्ही राज्यांवर अर्थसंकल्पात ज्या पध्दतीने सर्वाधिक झुकते माप दिले आहे. हे पाहता महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्रातील जनतेवर हा घोर अन्याय असून लाचार महाराष्ट्र सरकारची हि नामुष्की आहे. अजितदादांनी केलेल्या विशेष पॅकेज मागणीत महाराष्ट्रातील कांदा, केळी, कापुस, सोयाबीन उत्पादकांसाठी ना धोरण ना कोणतीही आर्थिक तरतुद नाही. महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकऱ्यांवर घोर अन्याय नाही का. ? दोन वर्षापूर्वीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची गॅरंटी मोदी सरकारने देऊन सुध्दा संसदेत मांडलेल्या आर्थिक पाहणी अहवालातील भारताच्या कृषी क्षेत्राची झालेली पिछेहाट कृषी विकासाची खिल्ली उडवणारी आहे.
अर्थसंकलपात शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य लोकांसाठी धोरण किंवा तरतुद आहे का. ? हा फसव्या घोषणाचा निरर्थक पाऊस असून जुमलेबाज धोरणांचा "अर्थहीन संकल्प" असल्याची टीका पाचोरा - भडगांव मतदारसंघांत आगामी विधानसभा लढविणाऱ्या उबाठा शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी केली आहे.

Post a Comment