*पाचोरा शहरातील मुस्लिम तरुणांचा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश*
वैशालीताई सुर्यवंशी यांना विधानसभेत पाठविण्याचा निर्धार!
(रिपोर्टर - आबा सुर्यवंशी )
पाचोरा (जळगांव)-शहरातील मुल्लावाडा परिसरातील मुस्लिम तरूणांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात उबाठा शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून जाहीर प्रवेश घेतला.
आगामी निवडणुकीआधी मतदारसंघातून वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश होत आहेत. पाचोरा शहरातील मुल्लावाडा भागातील तरूणांनी प्रवेश घेतला. या सर्वांचे वैशालीताई सुर्यवंशी यांनी स्वागत केले.
या प्रवेश प्रसंगी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासह उध्दव मराठे, ऍड. अभय पाटील, संदीप जैन, बंटी हटकर, मनोज चौधरी, हरीश देवरे, निखील सोनवणे व तुषार जगताप यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment