अंबरनाथ शहर पूर्व भागातील काकोळे गावाच्या न्याय हक्कासाठी रेलनीर प्रकल्प व्यवस्थापन व मनोज खाद्दयान भांडार व बोगस मिलेनियम ग्रुप कंपनी च्या विरोधात १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी 11 वाजता स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मा. मनोज गायकर यांचे आमरण उपोषण
आयडियल इंडिया न्यूज
रिपोर्टर आशिष देशपांडे अंबरनाथ मुंबई
अंबरनाथ शहर पूर्व येथील काकोळे गावातील ब्रीटीश कालीन जी.आय.पी.धरणावर कालांतराने भारतीय रेल्वे अंतर्गत आय.आर.सी.टी.सी.चा.रेलनीर प्रकल्प उभारते वेळी काकोळे ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखल्याच्या अधिन राहून अनेक आश्वासने देत रेलनीर प्रकल्पाला विरोध न करण्यासाठी गावकऱ्यांची मर्जी राखत अनेक आश्वासने दिली असता रेलनीर प्रकल्पाला सुरुवात झाली काकोळे गावकऱ्यांचे १२ टेंपो चे वाहन मालक दि.०१ एप्रिल २०२४ पर्यंत प्रामाणिक पणे मालवाहतूक सेवा देत असताना अचानक मनोज खाद्दयान भांडार यांनी कोणत्याही प्रकारची माहिती किंवा पुर्व सुचना न देता काकोळे गावकऱ्यांची १२ वाहने बंद करून दि.१५ मे २०२४ रोजी मनोज खाद्दयान भांडार यांनी बाहेर गावच्या मिलेनियम ग्रुप ऑफ कंपनी यांच्या बरोबर हात मिळवणी करून स्वताच्या वयक्तीक फायद्यासाठी काकोळे गावातील ग्रामस्थांची वाहने बंद केल्याने 12 मालवाहतूकदार शेतकरी यांच्या वर उपासमारीची वेळ आली असून सदर टेंपो हे लोन द्वारे काढले असल्यामुळे बॅंके चे हप्ते सुद्धा भरता येत नसून कर्ज सुद्धा वाढत असल्याने रेलनीर च्या मनमानी कारभाराच्या विरोधात मा. मनोज गायकर यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री मा. अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे, खासदार मा.श्रीकांत शिंदे, आमदार श्री.गणपत गायकवाड यांच्या सह अनेक वरिष्ठ मान्यवर अधिकारी साहेब यांच्या पर्यंत रेलनीर प्रकल्पाच्या माध्यमातून ठेकेदार मनोज खाद्दयान भांडार यांचा मनमानी कारभाराच्या विरोधात पत्र व्यवहार करत दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी मा.मनोज गायकर आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या पाठीशी अनेक समाजसेवक, पत्रकार बांधव, सामाजिक संघटना, संस्था, राजकीय पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते, यांनी भेटी देत त्यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला असून काकोळे गावातील ग्रामस्थ नागरिक त्यांच्या सोबत असणारे मनोज गायकर, सुर्यकांत गायकर, सुरेखा गायकर, संतोष गायकर , श्रीकांत गायकर यांच्या सह अनेक मान्यवर काकोळे गावकर मनोज गायकर यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहेत.



Post a Comment