*बदलापूर शहरातील आदर्श शाळेत चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारास कारणीभूत मुख्याध्यापक व शाळा प्रशासनाला जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तसेच गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यावी ह्या मागणी साठी बदलापूर शहर 20 ऑगस्ट 2024 रोजी बंद ची हाक*
आयडियल इंडिया न्यूज
रिपोर्टर आशिष देशपांडे अंबरनाथ मुंबई
रिपोर्टर विशाल सावंत
बदलापूर शहरातील आदर्श शाळेत अक्षम्य कृत्याबद्दल आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करत शाळेतील मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन हे सुद्धा झालेल्या अत्याचारीक घटनेस तितकेच जबाबदार आहेत कारण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असणे अत्यंत आवश्यक आहे परंतु मुख्याध्यापक यांच्या हलगर्जीपणा मुळे एक भयंकर घटना घडण्यास आदर्श शाळा कारणीभूत ठरली असून घडलेल्या घटनेस मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन हे जबाबदार आहेत शाळेतील मुख्याध्यापक यांच्या दुर्लक्षित पणा मुळे एका लहान चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला
असून सीसीटीव्ही कॅमेरा जर चालू असते तर आज सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये झालेल्या अत्याचारीक घटनेचा महत्त्वाचा पुरावा मिळाला असता आणि अत्याचार झालेल्या मुलीस न्याय मिळवून देण्यासाठी अती महत्त्वाचा पुरावा ठरला असता परंतु शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पुरावा नष्ट झाला असून पुरावे नष्ट होण्यास जबाबदार आदर्श शाळेतील मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन ला जबाबदार ठरवत बदलापूर शहरातील नागरिकांनी बदलापूर शहर बंद ची हाक देत आंदोलन छेडले असून आदर्श शाळेत चिमुकल्या मुलींवर जो अत्याचार झाला त्या शाळेची नागरिकांनी तोडफोड करत बदलापूर रेल्वे स्टेशनवर उतरून आंदोलन करत आरोपीला केलेल्या अक्षम्य कृत्याबद्दल फाशीची शिक्षा देण्याची मागणी बदलापूर चे रहिवासी करत आहेत.



Post a Comment