रक्षाबंधन हा सण भावाभावांतील प्रेम, आपुलकी, आणि सुरक्षा यांचे प्रतीक आहे.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद

रिपोर्टर जोशना अहिरे पाचोरा भडगाव




रक्षाबंधन हा सण भावाभावांतील प्रेम, आपुलकी, आणि सुरक्षा यांचे प्रतीक आहे. "मेरी राखी की डोर कभी होना ना कमजोर, भैया दे दो कलाई बहेन आई है..." अशा ओळी प्रत्येक बहिण आपल्या भावाच्या कलाईला राखी बांधताना गुणगुणते. या विशेष सणाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात 36 मराठा मेडीयम रेजिमेंटच्या जवानांसाठी राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


या कार्यक्रमात श्री. ललित चोबे, सौ. गुणल चोबे, सौ. कीर्ती पिंपळे, सौ. स्मिता जोशी, चिल्ड्रेन पार्क इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व शिक्षिका व बालगोपाल, शौर्य अकॅडमी आणि प्राप्ती योगा ग्रुपच्या विद्यार्थिनींनी जवानांना राखी बांधली. या उपक्रमाचे आयोजन 36 मराठा मेडीयम रेजिमेंटचे मेजर. अभय यादव सर व समाज गौरव पुरस्कार प्राप्त श्री गजानन पिंपळे (पूर्व भारतीय सैनिक) यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.




कार्यक्रमात NSG कमांडो ज्ञानेश्वर कोल्ते, श्री सुदाम साळुंके, अशोक हंगे, शेख हय्यास यांसारखे माजी सैनिक देखील उपस्थित होते. देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्यावर असलेल्या जवानांना राखी बांधून आणि त्यांचे तोंड गोड करून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला देशभक्ती व राष्ट्रसेवेचा संदेश देण्याचा उद्देश होता.

कार्यक्रमाच्या शोभेला आणखीनच भर घालत, श्री. सुधीर गोसावी यांनी सुंदर गीत गायन केले, ज्यामुळे वातावरण अधिकच भावनिक व प्रेरणादायी बनले.


*आपला विश्वासु,*

श्री. गजानन पिंपळे (पूर्व भारतीय सैनिक)

९८५००२०८५२

Post a Comment

Previous Post Next Post