कान्ता मानू राठौड़ पुणे महाराष्ट्र
कार्यसिद्धी प्रतिष्ठान तर्फे शिवाजी मुसळे यांना भूषण पुरस्कार प्रदान
13/10/2024 रोजी
भूम परंडा वाशी येथील पुणे जिल्ह्यातील रहिवासी दक्षिण पुणे कात्रज भागातील कौटुंबिक स्नेह मेळावा स्थळ माऊली गार्डन मंगल कार्यालय कात्रज कोंढवा रोड कात्रज पुणे येथे संपन्न झाला .
यावेळी प्रमुख उपस्थिती कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गिरीराज सावंत साहेब तसेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील साहेब, कुलदीप (तात्या) कोंडे शिवसेना शिंदे गट मा. जिल्हा परिषद सदस्य तसेच आकाश नारायण फासणे उपाध्यक्ष पुणे डिस्टिक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यसिद्धी प्रतिष्ठान तर्फे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी व आपल्या जीवनामध्ये वैयक्तिक स्थान निर्माण करणारे झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक सचिव शिवाजी मुसळे यांना भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. याचबरोबर भैरवी सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष,मोरया नर्सिग
हॉस्पिटल सुचेता भालेराव मॅडम व सामाजिक कार्यकर्ते कात्रज वाघजाई नगर भागातील नानासाहेब पिंगळे साहेब व इतर मान्यवर यांना भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
निमंत्रक चंद्रकांत सरडे साहेब उद्योजक
तसेच इतर क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व विविध भागातील मान्यवर यावेळी उपस्थित होते मोठ्या संख्येने यावेळी मान्यवर व जन समुदाय उपस्थित होता यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.


Post a Comment