*बाळद सरपंचपदी अनिता पाटील बिनविरोध*
आबा साहब सूर्यवंशी
पाचोरा (प्रतिनिधि)-बाळद येथे सरपंच निवडी साठी दि.१६ मे गुरुवार रोजी निवडणूक घेण्यात आली. दोन महिन्यापासून ग्रामपंचायत वर प्रशासक म्हणून कामकाज सुरू होते. सरपंच म्हणून ग्राम पंचायत सदस्य अनिता दगडू पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना सरपंच म्हणून बिनविरोध घोषित करण्यात आले. निवडणूक अधिकारी म्हणून सुधाकर पाटील यांच्या सोबत ग्राम विकास अधिकारी बि. एन. पाटील, तलाठी दिपाली बावने यांनी काम पाहिले.तर ग्रामपंचायत लिपिक दिगंबर पाटील रोजगार सेवक जितेंद्र पाटील संगणक ऑपरेटर संदीप पाटील यांनी सहकार्य केले. पॅनल प्रमुख शितल दादा सोमवंशी सोनी राम मोरे,रवींद्र झवर शिवदास मोरे, विश्वनाथ सोमवंशी, तंटामुक्त अध्यक्ष रवींद्र सोमवंशी ,पोलीस पाटील नितीन पाटील, प्रमोद सोमवंशी, संग्राम सोमवंशी, दत्तू निकम ,संदीप सोमवंशी, भास्कर सोमवंशी, सुरेश सोमवंशी, हिरकनबाई मोरे ,जिजाबाई चव्हाण, राजेंद्र मोरे, दीपक सोमवंशी धना मोरे, अनिल पाटील, दिलीप मोरे,अरुण सोमवंशी दिपक पवार ,ग्रामपंचायत सदस्य दर्शन सोमवंशी वैशाली मोरे,
राजेंद्र पाटील, दिपाली पवार, शिलाबाई झवर, रमेश सोमवंशी ,तात्या सोनवणे, जयश्री ठाकरे यांनी बिनविरोध सरपंच साठी अनिता मोरे यांचे नावाला संमती दिली. सौ.अनिता राजेंद्र पाटील यांची सरपंच पदावर निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे माजी उप सभापती बापूसाहेब प्रकाश सोमवंशी ,पॅनल प्रमुख शितल सोमवंशी यांच्या सह गावातील ग्रामस्थांनी नवनियुक्त सरपंच यांचा सत्कार, सन्मान करून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या.



Post a Comment