विश्वकर्मा विद्यालय इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमाचा इयत्ता दहावी चा १००℅ निकाल

 विश्वकर्मा विद्यालय इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमाचा इयत्ता दहावी चा १००℅ निकाल 

रिपोर्ट, राहुल दाहोत्रे पुणे महाराष्ट्र 







पुणे: बिबबेवाडी बन्सीलाल रामनाथ अगरवाल चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित विश्वकर्मा विद्यालय इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमाचा एसएससी परीक्षा मार्च 2024 चा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यशाची परंपरा राखली . कु. सुरगुडे जान्हवी 98.40%(मराठी माध्यम )कु. प्रणाली चंद्रकांत ढमाल हिने 94.00℅ ( इंग्रजी माध्यम )गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला .मराठी माध्यमातून द्वितीय क्रमांक कु.वाघमोडे निशा 96.60% कु.भारती स्वप्नाली 96.60% तृतीय क्रमांक कु. कड श्रूती 92.00% तर इंग्रजी माध्यमातून द्वितीय क्रमांक चि. धायगुडे कृषीराज 92.40% तृतीय क्रमांक चि.सार्थक भरेकर 92.00% या विद्यार्थ्यांनी मिळवला .विद्यालयातील दोन्ही माध्यमांची मिळून एकूण विद्यार्थी 265 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते .त्यापैकी विशेष योग्यता प्राप्त श्रेणी मध्ये 150 विद्यार्थी तर प्रथम श्रेणी मध्ये 104 विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये 11 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 90% च्या पुढे एकूण विद्यार्थी 30 उत्तीर्ण झाले असून या विद्यार्थ्यांनचे शाळेच्या मुख्य आधारस्तंभ डॉ . तृप्तीजी अगरवाल, संचालिका श्रीमती.मधु शितोळे मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . सुलभा देशमुख ( मुख्या इंग्रजी माध्यम )श्री.राजेंद्र जाधव (मुख्या.मराठी माध्यम) यांनी सर्व शिक्षक ,यशस्वी विद्यार्थी, व पालक यांचे अभिनंदन केले असून सर्व स्तरातून कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post