*जयकिरण प्रभाजी पतसंस्थेच्या वतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात मोफत आरओ सिस्टीम भेट*
--------------------------------
पतसंस्थेच्या जनहिताच्या कार्याचे कौतुक
-----------------------------------
रिपोर्टर - आबासाहेब सुर्यवंशी
पाचोरा - येथील जयकिरण प्रभाजी पतसंस्था बँकिंग क्षेत्रात नावलौकिक मिळवून आहे. बँकेच्या माध्यमातून विविध स्तरावर कार्य करीत असतांना या संस्थेचे चेअरमन आणि संचालक मंडळ सामाजिक , शैक्षणिक, व्यावसायिक, आणि सुदृढ आरोग्य सुविधा साहित्यांचे मोफत वाटप करून समाजात एक वेगळा संदेश देण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतात.नुकतेच या पतसंस्थेने २७ व्या वर्षात पदार्पण केले आहे.
जयकिरण प्रभाजी पतसंस्थेच्या २७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत या संस्थेने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणारे रूग्णांना आणि त्यांच्या सोबत असलेल्या नागरिकांना रुग्णालयात थंड पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशातून संस्थेचे चेअरमन अतुल संघवी यांनी पतसंस्थेच्या वतीने स्व: खर्चातून ग्रामीण रुग्णालयात थंड पाण्याचे आरओ सिस्टीम बसवून दिले.
आरओ सिस्टीमचे उद्घाटन पतसंस्थेचे चेअरमन ऍड.अतुल संघवी यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण रूग्णालयात उपचाासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्ण, सर्व सामान्य नागरिकांना थंड पाण्याचे उपकरण मोफत बसवून दिल्या बद्दल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष टाक यांनी पतसंस्थेच्या जनहितांच्या कार्याचे कौतुक करून आभार व्यक्त केले.या प्रसंगी पतसंस्थेचे संचालक डॉ.मनोज पाटील, ऍड. आण्णासाहेब भोईटे, शिवाजी आव्हाड, सपनेश बाहेती, गजानन काकडे, ईश्वर पाटील, डॉ.अमित साळुंखे, पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेश जैन, आदीं सह संस्थेचे, कर्मचारी, रुग्णालयाचे डॉक्टर्स, नर्सेस, अन्य स्टाफ उपस्थित होते.


Post a Comment