वैशालीताई सुर्यवंशी यांचे नेतृत्वावर विश्वास* भडगाव तालुक्यातील १२० तरूणांचा उबाठा सेनेत प्रवेश

 *वैशालीताई सुर्यवंशी यांचे नेतृत्वावर विश्वास* 

भडगाव तालुक्यातील

१२० तरूणांचा उबाठा सेनेत प्रवेश -------------------------

(रिपोर्टर - आबा सुर्यवंशी)




भडगाव- दि.२० शनिवार रोजी जुलै आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात तालुक्यातील तीन गावांमधील १२० तरूणांनी प्रवेश घेतला असून वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी या सर्वांचे स्वागत केले.

परिवर्तनाचा नारा बुलंद करत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी पाचोरा-भडगाव


 मतदारसंघातील जनतेला साद घातली असून त्यांना मतदासंघांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यरत तरूण मोठ्या संख्येने वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून उबाठा पक्षात सामील होत आहे. भडगाव तालुक्यातील बांबरूड प्र. बहाळ, रोकडा फार्म आणि गुढे या गावातील १२० तरूणांनी आज पक्षात प्रवेश घेतला. या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख दीपक पाटील, तालुका प्रमुख जे. के.पाटील, योजनाताई पाटील, रतन परदेशी, डी. डी.पाटील सर, माधव जगताप, चेतन रंगनाथ पाटील, चेतन पाटील, भैय्या सुर्यवंशी, पप्पू राजपूत, आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post