श्री.गो. से.हायस्कूल मध्ये विधिसेवा शिबिर*

 *श्री.गो. से.हायस्कूल मध्ये विधिसेवा शिबिर*

 (रिपोर्टर - आबा सुर्यवंशी )  






पाचोरा - पिटीसी संस्था संचालित श्री. गो. से. हायस्कूल प येथे दि. २० जुलै शनिवार रोजी तालुका विधीसेवा समिती व तालुका वकील संघ पाचोरा व  गो.से. हायस्कूल च्या संयुक्त विद्यमाने विधी शिबिराचे  आयोजन करण्यात आले. न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी.बी.औंधकर सो. न्यायमूर्ती एस.व्ही. निमसे, न्यायमूर्ती श्रीमती जी.बी.बोरा मॅडम, तालुका वकील संघाचे अध्यक्ष  प्रवीण पाटील यांचा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पी.एम.वाघ व अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाबाचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.

  बेटी बचाव बेटी पढाव' या विषयावर शाळेतील उप शिक्षिका श्रीमती श्रद्धा पवार मॅडम, 'मुलांचे अधिकार' या विषयावर ऍड. राहुल पाटील, 'शिक्षणाचा अधिकार'या विषयावर ऍड. कु.चंचल पाटील, 'पोस्को कायदा' या विषयावर ऍड. जी.डी. पाटील यांनी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

       आपल्या अध्यक्षीय भाषणातून न्यायमूर्ती श्री. जी.बी औंधकर  यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना स्री-पुरुष समानता, समाजतील आई-वडिलांचे व शिक्षकांचे स्थान, मुली व महिलांची सुरक्षा व त्यातील कायद्यातील तरतुदी याविषयी मार्गदर्शन केले. 'बेटी बचाव बेटी पढाव' या विषयावर विद्यार्थिनींनी  पथनाट्य सादर केले.

 या प्रसंगी उपमुख्याध्यापक  एन.आर. ठाकरे  आर. एल.पाटील  ए.बी.अहिरे सर, पाचोरा वकील संघाचे पदाधिकारी सर्व सदस्य, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post