*पाचोरा नगरपरिषद प्रशासना तर्फे मोकाट गुरां ढोरांवर कार्यवाही सुरू*
नागरिकांनी त्यांच्या मालकीची जनावरे खाजगी जागेत बांधून ठेवावे.
मुख्याधिकारी श्री मंगेश देवरे यांचे आवाहन
(रिपोर्टर - आबा सुर्यवंशी)
पाचोरा (जळगांव ) - नगरपरिषद क्षेत्रातील रहदारीस अडथळा निर्माण करणारे मोकाट गुरे-ढोरे यांचेवर नागरीकांच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक २५ जुलै गुरुवार रोजी मुख्याधिकारी श्री. मंगेश देवरे पाचोरा नगरपरिषद यांचे मार्गदर्शनाखाली नगरपरिषद पथकामार्फत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सदर कार्यवाहीत विविध ठिकाणाहून एकूण (११) मोकाट गुरे-ढोरे पकडून कोंडवड्यात टाकली आहे.
शहरातील नागरीकांनी आपल्या मालकीची गुरे-ढोरे शहरात मोकाट न सोडता आपल्या खाजगी जागेत बांधून ठेवावीत. मोकाट गुरे-ढोरे रास्त्यावर दिसल्यास जप्त करण्यात येवून गुरे- ढोरे मालकांवर दंडात्मक स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल. तसेच गुरे मालकांवर गरज भासल्यास कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल व जप्तीची कार्यवाही सतत पुढे सुरु राहील याची गुरे-ढोरे मालकांनी नोंद घ्यावी. सदर कार्यवाहीमध्ये तुषार नकवाल स्वच्छता निरिक्षक, अनिल पाटील, राजू लहासे, आकाश खैरनार, विशाल पवार, गोविंदा पारोचे, सुशिल सोनवणे, तेजस सोपे, कैलास फतरोड, विशाल खरारे, दिपक ब्राम्हणे यांचा सहभाग होता.



Post a Comment