*आ. किशोर आप्पा पाटील यांच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास* पिंपळगाव गटातील भाजपा, उबाठा समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश!

 *आ. किशोर आप्पा पाटील यांच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास* 

पिंपळगाव गटातील भाजपा, उबाठा समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश!

(रिपोर्टर - आबा सुर्यवंशी)

      पाचोरा ( जळगांव)- पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव , निंभोरी येथील तडवी समाजातील कार्यकर्ते भाजपचे अमोल शिंदे गटात आणि पिंपळगाव येथील उ.बा.ठा. शिवसेनेच्या गटात असलेल्या कार्यकर्त्यांनी कार्यसम्राट ,दमदार भूमिपुत्र आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील , माजी नगराध्यक्ष संजय गोहिल,


 शेतकी संघ संचालक वसंत जीभाऊ , चंद्रकांत धनवडे , शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर ,नंदू पाटील, जिल्हा परीषद माजी सदस्य पदमसिंग पाटील,माजी नगरसेवक शीतल भाऊ सोमवंशी,बंडू चौधरी , शहरप्रमुख सुमित सावंत, राजू पाटील, जितू पेंढारकर , पिंपळगाव पदाधिकारी रवी गीते, बाळू रामसे, लोटन कुंभार , किरण टेलर, विजय काळे, राकेश वाघे, पवन तेली, नींभोरी येथील भैय्या पाटील, सागर पाटील, काशिनाथ भाऊ आदि उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post