*अंबरनाथ*वाहतूक विभागाची* *उत्तम* *कामगिरी** *आनंद** *नगर एमआयडीसी हायवे* *येथील खड्ड्यांचे केले * *निवारण वाहतूक पोलिसांचे रिक्षा चालक मालक यांनी मानले* *आभार**
आयडियल इंडिया न्यूज
रिपोर्टर आशिष देशपांडे अंबरनाथ मुंबई
अंबरनाथ शहरातील नगरपालिकेच्या अंतर्गत सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे ठेके ज्या कॉन्ट्रॅक्टर ला दिले त्यानें वैभव हॉटेल समोरील हायवे चा काही भाग थुकपट्टी करत डांबरीकरण चा केल्याने पहिल्याच पावसात ठेके दाराचे पितळ उघडे पडले डांबरीकरणाचा रस्ता गेला वाहून त्या मुळे एमआयडीसी महा मार्गावर वाहतूक कोंडी च्या समस्या वाढविण्यास कारणीभूत नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि ठेकेदार ठरले असून अंबरनाथ शहरातील वाहतूक विभागाचे इंचार्ज विजय पूरानीक साहेब, गणेश पाटोळे साहेब यांनी स्वतः खडी मागवत 6 ते 7 वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जेसीबी च्या साहाय्याने खड्डे भरण्याचे कार्य केले.
अंबरनाथ शहरातील वाहतूक पोलीसांनी जी उत्तम कामगिरी केली त्या बद्दल रिक्षा चालक मालक तसेच प्रवासी नागरिकांनी मानले वाहतूक विभागाचे आभार




Post a Comment