श्री. गो.से. हायस्कूलच्या मध्ये *विठ्ठल नामाची भरली शाळा*

 श्री. गो.से. हायस्कूलच्या मध्ये

*विठ्ठल नामाची भरली शाळा* 

*रिपोर्टर - लक्ष्मण आबा सुर्यवंशी*(जिल्हा प्रतिनिधी)

पाचोरा - 





आषाढी एकादशीनिमित्त व जागतिक साक्षरता व आरोग्य दिनानिमित्त पाचोरा शहरात पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से हायस्कूल पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी दिंडी काढून पाचोरा शहराचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थिनीनी तुळशी वृंदावन घेऊन वृक्षारोपणाचा संदेश दिला. श्री. गो.से हायस्कूल येथून भडगाव रोड, छत्रपती संभाजी महाराज चौक, माजी आ. दिलीप वाघ यांचे निवासस्थान, चेअरमन संजय वाघ यांचे निवासस्थान येथून गणेश कॉलनी व थेपडेनगर भगातून रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये विठ्ठल नामाचा जयघोष, साक्षरता व आरोग्य दिनाच्या घोषणा देण्यात आल्या. संस्थेचे चेअरमन संजय वाघ. यांच्या निवासस्थानी दिंडीचे पूजन व विठ्ठल रुक्माई , ज्ञानदेव ,तुकाराम यांच्या वेशभूषेतील कलाकारांचे पूजन सौ. सूचेताताई वाघ,




 सौ.ज्योतीवाघ, आणि सर्व वाघ कुटुंब तर्फे पालखी पूजन करण्यात आले. त्या नंतर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये गोल रिंगण करून तालासुरात विठ्ठल नामाची लेझीम पथक टाळ मृदंग सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लक्ष्मी माता वारकरी संप्रदायाचे ह.भ.प योगेश महाराज व त्यांच्या वारकरी विद्यार्थ्यांनी दिंडीमध्ये सहभाग घेतला.या प्रसंगी खालील देशमुख, वासुदेव महाजन मुख्याध्यापिका सौ प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील, अंजली गोहिल, संगीत शिक्षक, कलाशिक्षक, क्रीडा शिक्षक, विद्यार्थी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सहभाग होता.

Post a Comment

Previous Post Next Post