*गस्त दरम्यान संशयिता कडून देशी कट्टा - काडतूस जप्त*
(जळगाव जिल्हा रिपोर्टर )
*आबासाहेब सूर्यवंशी*
चाळीसगाव - दि. १२ जुलै शुक्रवार मध्य रात्री ०३ ४५ सुमारास पोलिस गस्त दरम्यान नेहमीप्रमाणे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पो .कॉ. समाधान पाटील व अमोल पाटील हे चाळीसगाव बस स्टॅन्डवरील संशयित चेक करत असताना रात्री एक प्रवासी नामे गणेश तुकाराम पवार , वय -२५ , रा .नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड , जि. पुणे ह्यावर संशय आल्याने त्याची कसून झडती घेतली असता त्याचे कमरेला एक देशी कट्टा व पॅन्टचे खिशात दोन जिवंत काडतूस मिळून आले.या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपीवर चाळीसगाव शहर पो. स्टे. येथे गु.र.नं. २९७ /२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ०३,२५ ,२९ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पी.एस.आय. श्री.माळी करत आहेत
. आरोपी गणेश पवार याचे गुन्हे अभिलेख तपासला असता आरोपीतावर आळंदी पो. स्टे .येथे २०२४ मध्ये भारतीय हत्यार कायदा ०३,२५,२९ अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी दिली.




.jpg)
Post a Comment