पाचोरा येथे भव्य बालकिर्तन महोत्सव*

 *पाचोरा येथे भव्य बालकिर्तन महोत्सव* 

(जळगांव जिल्हा रिपोर्टर)

*आबासाहेब सुर्यवंशी*






      पाचोरा- शहरातील लक्ष्मीमाता वारकरी शिक्षण संस्था तथा अनाथालय यांनी आषाढी एकादशी निमित्ताने संस्थेत भव्य अशा बाल कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवांमध्ये सर्व कीर्तने लहान मुलांची होणार असून त्यांच्या मुखातून भगवंताच्या गुणांचे वर्णन ऐकण्यास मिळणार आहे. ही आपणा सर्वांसाठी एक विशेष पर्वणी आहे.

     पाचोरा येथील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था या संस्थेमध्ये वर्षभर विद्यार्थ्यांना भजन कीर्तन, प्रवचन, गायन, पखवाज वादन आदी शिकविले जाते. त्यासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्यावर भर दिली जाते. संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने गेले असताना आपल्या पाचोरा शहरात देखील भगवंताच्या नामाचा गजर व्हावा या हेतूने संस्थाचालक ह.भ .प. सुनीताताई पाटील व योगेश महाराज पाटील या दोघांनी आपल्या शहरात देखील पंढरपूर अवतरावे या अनुषंगाने संस्थेमध्ये असलेल्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये बाल कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. या सप्ताहामध्ये सकाळी काकड आरती त्यानंतर विष्णुसहस्रनाम त्यानंतर दुपारून प्रवचन हरिपाठ व रात्री कीर्तन अशा पद्धतीने सात दिवसाचा दिनक्रम असणार आहे. सात दिवसाच्या कीर्तनामध्ये अंकुश महाराज चव्हाण, वैशालीताई ठाकरे, सागर महाराज धुमाळ, यश महाराज चव्हाण, सुषमाताई राजपूत, कार्तिकीताई महाराज पाटील, निखिल महाराज पाटील यांचे कीर्तन होणार असून काल्याचे किर्तन आदेश महाराज जाधव यांचे होणार आहे. या सप्ताहामध्ये गायक आणि वादक हे सुद्धा लहान मुलाच आहेत गायनासाठी साथ प्रवीण महाराज राजपूत, स्वप्निल महाराज अहिरे, गोपाल महाराज पाटील, साई महाराज धुमाळ, वैष्णवीताई नलावडे आणि देवयानीताई पाटील हे करणार आहे .मृदुंग वादनासाठी रामप्रसाद महाराज गायकवाड, गुणवंत महाराज चौधरी, राधिकाताई महाराज पाटील हे साथ करणार आहेत. तरी बाल कीर्तनकारांच्या कार्यक्रमांचा लाभ शहरवासीयांनी घ्यावा असे आवाहन योगेश महाराज व सुनिताताई यांनी केले आहे. तसेच संस्थेतर्फे आषाढी एकादशीच्या दिवशी गावामध्ये नगरप्रदक्षिणा होणार आहे.






Post a Comment

Previous Post Next Post