*श्री.गो.से. हायस्कूल येथे वाहतूक सुरक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न.*
(रिपोर्टर - आबा सुर्यवंशी)
पाचोरा (जळगांव ) - पिटीसी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे दि. २२ जुलै रोजी वाहतूक सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.
पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे साहेब यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
पोलीस उपनिरीक्षक श्री .गनगे साहेब यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नवीन कायदे, सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, आर्थिक फसवणुकीचे गुन्हे, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी व
विद्यार्थ्यांनी, पालकांनी मोबाईल वापरताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. या प्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक एन.आर.ठाकरे ,आर. एल.पाटील ,ए.बी.अहिरे आर.बी.तडवी आदींची उपस्थिती होती.


Post a Comment