API सरांची परवानगी घेऊन आम्ही घरी निघालो व सकाळी कोल्हापूर वरून आलेल्या नातेवाईकांकडे व्यक्तीला सोपविण्यात आले


API सरांची परवानगी घेऊन आम्ही घरी निघालो व सकाळी कोल्हापूर वरून आलेल्या नातेवाईकांकडे व्यक्तीला सोपविण्यात आले 

रिपोर्टर राजू पाटील पुणे महाराष्ट्र 



 31 मे 2024 रात्री 12 45 मिनिटांनी कोल्हापूर येथून एक आपदा मित्र  श्रीपाद सामंत यांचा मला फोन आला की त्याचा एक मित्र प्रेम भंग झाल्या मुळे आत्महत्या करण्यास जात आहे त्या व्यक्तीने दुपारच्या दरम्यान उजव्या हाताच्या नसा  कापून घेतले होत्या पण सुदैवाने वेळेवर उपचार भेटल्याने तो बचावला त्याने तो फोटो आपल्या मित्रांना पाठवून हा माझा शेवटचा फोटो व  शेवटचे संभाषण बोलून तो मध्यरात्री आळंदी चाकण घाट मार्गे आत्महत्या करण्यास गेला होता अशी माहिती मला फोन करून देण्यात आली होती  मी माहिती घेतल्यावर आळंदी फायर ब्रिगेड वाहन चालक विलास पवार फोन करून यांना माहिती दिली व त्यांनी मला आळंदी पोलीस स्टेशनला कळविण्यात सांगितले नंतर मी पोलिसांना सर्व माहिती फोटो लोकेशन फोन नंबर मुलाचे नाव व्हाट्सअप वर पोलीस स्टेशनच्या  मोबाईल नंबर वर पाठवले त्यानंतर मी स्वतः आपत्ती व्यवस्थापन सदस्य व आपदा मित्र दिलीप गायकवाड, सलीम मोमीन, यांना फोन करून घटनेची माहिती सांगितली या गोष्टीचे गंभीरता ओळखून दिलीप गायकवाड यांनी  आपण जायला पाहिजे असे सांगितले त्यानंतर आम्ही तिघेजण आळंदी चाकणच्या दिशेने निघालो आम्हाला त्यादरम्यान काहीही कुठेही त्याचा शोध लागला नाही त्यादरम्यान आळंदी पोलीस स्टेशनची तपासण्यासाठी आलेली गाडी आम्हाला दिसली व ती सुद्धा परत निघाली होती नंतर आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरापाशी नदीच्या किनारी शोध घेतला त्यादरम्यान दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नदीकिनारी आम्हाला ती व्यक्ती दिसली आम्ही तिघेही त्या ठिकाणी पोचलो व त्या व्यक्ती बद्दल शहानिशा केल्यावर तीच व्यक्ती निघाली व त्यानंतर आळंदी पोलीस स्टेशनला व्यक्ती भेटल्याची माहिती दिल्यावर त्यांनी आम्हाला ठिकाण विचारल्यावर ते ठिकाण दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असल्यामुळे आम्हाला त्यांच्याकडे जायला सांगितले नंतर आम्ही त्या व्यक्तीला घेऊन दिघी पोलीस स्टेशनला निघालो पण तो पळून जाईल या हिशोबाने आम्ही त्यांचा मोबाईल स्वतःकडे जमा करून घेतला व तो आमच्या मागे मागे आला पोलीस स्टेशनला गेल्यावर रात्रपाळीचे सर्व  पोलीस अधिकारी वर्ग कामांमध्ये मग्न होते मी एपीआय सरांना सर्व घटनेची माहिती दिली व त्यांनी त्वरित घटना संवेदनशील ओळखुन त्या व्यक्तीला खुप छान पद्धतीने उपदेश, उदाहरण देऊन प्रेरणा देऊन त्याचे आत्महत्या करण्याच्या वृत्तीतून  परिवर्तन केले या दरम्यान मध्य रात्री चे 3:30 वाजले होते API सरांची  परवानगी घेऊन आम्ही घरी निघालो व सकाळी कोल्हापूर वरून  आलेल्या नातेवाईकांकडे व्यक्तीला सोपविण्यात आले  🙏🏻🙏🏻🙏🏻

या शोध कार्य मध्ये सहभागी सदस्य 

दिलिप गायकवाड, सलीम मोमीन, विलास पवार, व  संतोष शेलार 

 सहकार्य 

आपत्ती व्यवस्थापन संघ महाराष्ट्र

आपदा मित्र पुणे

आळंदी अग्निशमन दल 

आळंदी पोलीस स्टेशन

दिघी पोलीस स्टेशन

Post a Comment

Previous Post Next Post