*अंबरनाथ शहर पूर्व शिवाजी नगर* *आनंद नगर एमआयडीसी ** *हायवे येथील चेंबर *चे *झाकण तुटले असून नगरपालिकेच्या* *कामकाज वर* **शंका ?*
*आयडियल इंडिया न्यूज*
*रिपोर्टर आशिष देशपांडे अंबरनाथ* *मुंबई*
अंबरनाथ शहरातील शिवाजी नगर परिसरातून जाणारा हा रस्ता आनंदनगर एमआयडीसी हायवे ला मिळत असून रस्ता च्या मधोमध असलेले चेंबरचे झाकण गेल्या चार दिवसांपासून तुटले असून त्या ठिकाणी नवीन झाकण न बसवता त्या ठिकाणी चुकिच्या चुकिच्या पद्धतीने त्या झाकण च्या बाजूला उपाययोजना केल्याचे दिसून येत असून अशा उपाययोजना करण्याने वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत असून पावसाचे दिवस असल्याने ह्या ठिकाणी दिवसा किंवा रात्री च्या वेळी अनेक छोटे मोठे एक्सीडेंट होताना दिसत आहेत. अंबरनाथ शहरातील ह्या शिवाजी नगर विभागात बसेस ला प्रवेश बंदी असताना वाहतूक विभागाच्या आशिर्वादाने बे धडक प्रवेश करत असून ह्याच ठिकाणी अती प्रमाणात स्पीड बेकर नगरपालिकेच्या माध्यमातून टाकण्यात आल्याने सतत वाहतूक कोंडी होत असून ह्याच विभागातील नगरसेवकांचा मात्र ह्या गंभीर विषया बाबत कायमच कानाडोळा होताना दिसून येतो असे स्थानिक नागरिकाचे मत असून नगरपालिकेचे मुख्याधिकारी योग्य उपाययोजना करतील का असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.

.jpg)


.jpg)

Post a Comment