*पुणे शहरातील आझाद हिंद चालक संघटनेचे संस्थापक* *अध्यक्ष शफिक पटेल* *यांनी रिक्षा चालक-मालक* *संघटना कृती* *समिती यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध मागण्या मान्य न झाल्यास* *दि.5 जूलै 202
4* *रोजी सकाळी 11 वाजता पुणे शहरातील रिक्षा बंद चा* *दिला इशारा*
*आयडियल इंडिया न्यूज*
*रिपोर्टर आशिष देशपांडे अंबरनाथ* *मुंबई*
पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात 15 लाख ऑटो रिक्षा चालक असंघटित व स्वयंरोजगारीत आहेत. रिक्षाच्या भाड्याचे दर, नियम तसेच अटी व शर्ती हे महाराष्ट्र शासन तसेच प्रशासन ठरवत असते. आजचे तारखेस रिक्षा चालक हा प्रशासनाने अंमलबजावणी करीत असलेल्या फिटनेस विलंबशुल्क प्रति दिवस 50 रुपये, मुक्त रिक्षा परवाना धोरण तसेच काही दिवसांपूर्वी बाईक टॅक्सीला दिलेला हिरवा कंदील दिलेला यासोबत इतरही असंख्य कारणांमुळे रिक्षा व्यवसाय संकटात सापडलेला आहे.
* *फिटनेस विलंब शुल्क प्रति दिवस 50 रुपये ही अंमलबजावणी त्वरित रद्द करण्यात यावी.*
* *बाईक टॅक्सीना परवानगी नाकारण्यात यावी.*
* *मुक्त परवाना धोरण त्वरित बंद करावे.*
* *ई रिक्षांना परमिट सक्ती झालीच पाहिजे.*
* *ओला, उबेर, रॅपिडो या भांडवलदार कंपन्यांना बंदी घालावी.*
* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणा त्वरित अंमलबजावणी करावी.*
या मागण्यांसाठी पुण्यातील विविध संघटनांनी आंदोलन, उपोषण तसेच राजकीय नेत्यांना वारंवार विनंती केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापना तसेच दंड रद्द करण्याबाबत घोषणा व आश्वासन दिले परंतु त्याला पंधरा दिवस उलटून गेले असताना सुद्धा अंमलबजावणी केली नाही. यामुळे रिक्षा चालकांमध्ये सरकार विरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. रिक्षा चालकांच्या विविध प्रलंबित मागण्या तसेच भविष्यकाळात व्यवसायावर येणारे संकट यावर वेळीच मार्ग काढण्यात यावा,
या मागणीसाठी पुणे जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटना कृती समितीच्या वतीने दिनांक 05 जुलै 2024 रोजी पुणे शहरात रिक्षा बंद संप पुकारण्यात येत आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटना कृती समितीचे समन्वयक अशोक साळेकर यांनी दिली आहे. या संपामध्ये पुण्यातील 12 ते 15 रिक्षा संघटना सामील होणार आहेत.





Post a Comment