मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीआणली* *लाडकी बहिण* *योजना*

 *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीआणली* *लाडकी बहिण* *योजना* 


आयडियल इंडिया न्यूज 

रिपोर्टर आशिष देशपांडे अंबरनाथ मुंबई 



महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सुचित करण्यात आले की आज महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहिण योजना घोषित केलेली आहे या मध्ये १५०० / रूपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सदर योजना महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत राबवल्या जाणार आहे याच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे आहे. १) २१ ते ६० वर्ष वयोगटातील विवाहित,परितकत्या, विधवा महिला (२) त्या महाराष्ट्रातील रहिवासी असल्या बाबत चे अधिवास सर्टिफिकेट असावे (३) त्यांचे वर्षाचे उत्पन्न रू.२.५० लाखा पेक्षा अधिक नसावे म्हणजे कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न अडीच लाखापर्यांत असावे (४) बॅंके मध्ये सदर महिलेचे नावे खाते असावे (५) रेशनकार्ड मध्ये सदर महिलेचे नाव अंतर्भूत असावे .

सदर योजना अंतर्गत सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नारी शक्ती ॲपप्ले स्टोअर वरून आपल्याला देण्यात आलेल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यावयाचा आहे.

सर्वात महत्त्वाचे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आपली नोंदणी या अंतर्गत पुढील आठवड्यात सोमवार ते बुधवार पर्यंत १०० % करून घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नोंदणी सदर नारी शक्ती ॲप मध्ये करून घेण्याची जबाबदारी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्या वर सोपविण्यात आली आहे हि नोंदणी करत असताना लागणारी प्रोसिजर 

(1) उत्पन्नाचा दाखला सण 2025 पर्यंत वैध असणारा असावा (2) जन्माचा दाखला असावा / टि.सी झेरॉक्स असावी / डोमेसाईल प्रमाणात (3) रेशनकार्ड ची झेरॉक्स असावी (4) आधार कार्ड असावे (5) लाभार्थी नावाने बॅंक पासबुक असावे 

      अतिशय महत्त्वाचे माझी लाडकी बहिण योजनेचा फायदा संजय गांधी निराधार किंवा वृद्ध, अपंग यांना जर पेंशन भेटत असेल तर त्यांनी हा फार्म भरू नये तसेच pm किसान योजनेचे पैसे जर महिलेच्या खात्यात येत असतील तर त्या महिलेला देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.






Post a Comment

Previous Post Next Post