वीडियो न्यूज़*महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथील नगरपालिका वसाहतीत राहणाऱ्या सेवानिवृत्त सफाई कामगारांना हक्काची घरे मिळावीत या मागणीसाठी अंबरनाथ नगरपरिषदे समोर सफाई कामगारांचे आमरण उपोषण
आयडियल इंडिया न्यूज
रिपोर्टर आशिष देशपांडे अंबरनाथ मुंबई
वीडियो देखें
अंबरनाथ शहरातील सेवा निवृत्त सफाई कामगार गेल्या ४२ वर्षांपासून राहत असून त्यांना हक्काचे घर मिळावे,जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले काही मयत झालेले जे वैद्यकीय अपात्र झालेले आहेत त्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान (ग्रॅज्युएटी) लवकरात लवकर देण्यात यावी, शासकीय जी.आर.नुसार २५ वर्षे झालेले सफाई कामगार यांना मालकी हक्काचे घर मिळावे,
महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथील नगरपालिका वसाहतीत राहणाऱ्या कर्मचारी यांना १२ वर्षे ते २४ वर्षे वेतन श्रेणीचा फरक देण्यात यावा वरील सर्व मागण्या बाबत न्याय मिळावा त्या साठी सफाई कामगारांचे दोन प्रतिनिधी सुनिता राजू झुंज आणि अजय हरिचरण सियोते हे दोघे दि .८ जुलै २०२४ रोजी पासून आमरण उपोषणाला बसले असून ४ दिवस होऊन सुद्धा अद्याप त्यांना न्याय मिळाला नसून दि. १० जुलै २०२४ रोजी अजय हरिचरण सियोते यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचे समजले मनोहर गोपाळ झुंज,विजय कुमार विरण यांनी मुलाखत देताना स्पष्ट शब्दात त्यांनी त्यांच्या मागण्या मांडल्या असून त्यांना लवकरात लवकर त्यांना त्यांच्या हक्काची घरे मिळावीत तसेच मांडलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा आमरण उपोषण असेच सुरू राहणार अशी माहिती मनोहर गोपाळ झुंज, विजय कुमार विरण यांनी दिली.


Post a Comment