*कल्याण पश्चिम छाया टॉकीज ते* *स्टेशन रोड पर्यंत एक तास* *वाहतूक कोंडी ठप्प झाल्याने* *नागरिकांचा संताप वाहतूक* *विभागाचे अधिकारी लक्ष घालतील* *का नागरिकांचा सवाल*
*आयडियल इंडिया न्यूज*
*रिपोर्टर आशिष देशपांडे अंबरनाथ* *मुंबई*
कल्याण शहर हे एक नावाजलेले शहर असून सध्या कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी चे काम सुरू असून प्रवासी नागरिकांना मात्र वाहतूक कोंडी चा नाहक त्रास सहन करावा लागत असून दि. 2 जूलै 2024 रोजी सकाळी 7 :30 वाजता कल्याण पश्चिम येथील छाया टॉकीज ते कल्याण स्टेशन रोड पर्यंत एक तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती वाहतूक कोंडी मुळे नोकरदार वर्गाला या समस्या मुळे कामावर जाण्यास उशीर तर झालाच परंतु अनेकांना कंपनीत लेट पोचल्याने लेट मार्क लागण्याची शक्यता असू शकते ती नाकारता येत नाही.
वीडियो देखें
कल्याण शहरात निवडणूकीत प्रत्येक उमेदवारांच्या वचननाम्यात लिहिलेले असते कल्याण शहर वाहतूक कोंडीतून मुक्त करणार मात्र उमेदवार निवडून आल्यानंतर उमेदवार गायब होतात आणि कल्याण शहराची वाहतूक कोंडी जैसे थे तशीच राहते कल्याण शहरात आमदार, खासदार, नगरसेवक यांना नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ नाही कल्याण स्टेशन परिसरात वाहतूक विभाग मोठ्या प्रमाणात असताना वाहतूक कोंडी च्या समस्या चे निवारण करण्यासाठी वाहतूक पोलीस किंवा वार्डन यांचा ठिकाणा नसतो नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील कार्य होत नसल्याने समस्या चे निवारण होताना दिसून येत नाही.
कल्याण शहरातील स्टेशन परिसरात स्मार्टशिटी चे काम गेल्या काही वर्षांपासून काम सुरू असून स्मार्टशिटी चे काम मात्र कासव गतीने होत असल्याने कल्याण स्टेशन परिसरात सतत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहतूक कोंडीतून मुक्तता कधी मिळणार असे प्रश्न नागरीक विचारत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , खासदार श्रीकांत शिंदे, कल्याण शहरातील आमदार, नगरसेवक ह्या वाहतूक कोंडी सारख्या महा भयंकर समस्या चे निवारण करण्यासाठी योग्य उपाययोजना करतील का ?

Post a Comment