आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास* वैशालीताई सुर्यवंशी आणि अमोल शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

 *आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास* 

  वैशालीताई सुर्यवंशी आणि अमोल शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !------------------------


( रिपोर्टर - आबा सुर्यवंशी ) 




 पाचोरा (जळगांव)- दि.२१ जुलै रविवर रोजी पाचोरा शहरातील गाडगेबाबानगर, जुना अंतूर्लीरोड परिसरातील उबाठा शिवसेनेचे वैशालीताई सुर्यवंशी आणि भाजपाचे अमोल शिंदे    समर्थक कार्यकर्त्यांनी पाचोरा - भडगांव मतदारसंघांचे लोकप्रिय  दमदार, भूमिपुत्र कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून आमदारांच्या निवासी  शिवसेना कार्यालयात  शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे भगवा मफलर टाकून उस्फुर्त स्वागत केले. तसेच आगामी विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुकीत मतदार संघात अभुतपूर्व सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आणि पुन्हा तिसऱ्यांदा भगवा फडकविण्यासाठी जोमाने काम करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष बंडू चौधरी, स्विय्य सहाय्यक राजेश पाटील,शहरप्रमुख सुमित सावंत, सागर पाटील,  प्रविण ब्राह्मणे आदी उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post