सामुदायिक विवाह सोहळा संपन्न🌹 माननीय श्री मुकेश भाई अंबानी सौ.निताजी अंबानी परिवार व शिक्षक संचालित शिक्षण संस्था वाडा, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वाडा जि. पालघर.

 🌹सामुदायिक विवाह सोहळा संपन्न🌹

मुंबई से बालासाहेब पाटील की रिपोर्ट

 माननीय श्री मुकेश भाई अंबानी सौ.निताजी अंबानी परिवार व शिक्षक संचालित शिक्षण संस्था वाडा, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वाडा जि. पालघर.




 विवाह सोहळ्यात पालघर जिल्ह्यातील सुमारे 52 जोडप्यांनी रिलायन्स पार्क घनसोली नवी मुंबई या ठिकाणी सहभागी होऊन आपल्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा भाग प्रत्यक्ष अंबानी परिवारा सोबत साजरा केला.


 विवाहात प्रत्येक जोडप्याला सोन्याची अंगठी,मंगळसूत्र, कानातले, नथ. चांदीच्या वस्तू --- पैंजण, जोडवे, श्री गणेश जी मूर्ती, बाळकृष्ण मूर्ती, अन्नपूर्णा मूर्ती, वधूला एक लाख एक हजार रुपये, 

पाच हजार रुपया चे बारा गिफ्ट व्हाउचर, इत्यादी देण्यात आले. 




आज शिदवाडी पासून सुरू झालेला हा प्रवास अँटलियापर्यंत( रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख प्रत्यक्ष मुकेश अंबानी व नीता अंबानी व परिवारा पर्यंत जाऊन पोहोचला) या कार्यक्रमांमध्ये महत्त्वाची जबाबदारी मला व माझ्या सहकाऱ्यांना मिळाली होती.      


    ती आम्ही पूर्णपणे प्रामाणिकपणे मेहनत घेऊन पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आज प्रत्येकक्ष सौ.निताजी अंबानी यांनी गौरव करून कामाची पोच पावती दिली, चाळीसगाव तालुक्यातील शिदवाडी या छोट्याश्या गावातील एका शेतकऱ्याच्या मुलाचा जगातील सर्वोच्च उद्योगपतींच्या परिवाराकडून सत्कार करण्यात आला तो माझ्यासाठी व माझ्या आई, वडिलांसाठी पत्नी, मुलगा बहीण व परिवारा साठी खूप मोठा गौरवाच्या क्षण होता.समाजातील वंचित घटकांसाठी काहीतरी बेस्ट करण्याचा योग व संधी आज माझ्या शिक्षक संचालित शिक्षण संस्था व श्री. विशाल कुलकर्णी सर (सरचिटणीस ) यांनी दिली, त्या निमित्ताने त्यांचे खूप खूप धन्यवाद 🌹🙏🌹       


    आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादाने जगातील सर्वात महत्त्वाचा विवाह सोहळा संपन्न झाला, जीवनातील अविस्मरणीय घटना त्या घटनेत महत्त्वाची भूमिका पार पडण्याचा योग आला यांचा खूप- खूप आनंद आहे,



 विशेष म्हणजे समाजातील दुर्गम प्रदेशातील लोकांसाठी काही तरी करता आले याचा आत्मिक आनंद आहे.


 या सोहळ्या निमित्त अनेक जोडप्यांना कागदपत्रांच्या अभावामुळे घेता आले नाही त्या मुळे क्षमा असावी, यापुढे हि असेच आपले प्रेम आशीर्वाद असू द्यावे हि विनंती.       


 आपला स्नेहभिलाशी.


श्री. जितेंद्र जुलालसिंग पाटील सहशिक्षक स्वामी विवेकानंद विद्या मंदिर वाडा जि. पालघर.        


  व्हॉइस प्रेसिडेंट लॉयन्स कॅम्पस क्लब ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज वाडा




Post a Comment

Previous Post Next Post