लाईफ अफ्टर बाईट " कार्यक्रम वाय. सी. एम. हॉस्पिटल मध्ये संपन्न झाला

 " लाईफ अफ्टर बाईट " कार्यक्रम वाय. सी. एम. हॉस्पिटल मध्ये संपन्न झाला

वाचस्पति इंडिया न्यूज़ 

दशरथ शिन्दे पुणे 

वर्ल्ड फॉर नेचर आणि वाय सी एम हॉस्पिटल सैयुक्त विद्यमानाने " लाईफ अफ्टर बाईट " सर्पमित्र व डॉक्टर सपदंश अनुभव आदान - प्रदान बैठक आयोजित करण्यात आली.







या कार्यक्रमात वाय सी एम चे अनुभवी डॉक्टर व स्टाफ आणि महाराष्ट्रातील सर्पमित्र यांचे प्रशिक्षण " डॉ. सदानंद राऊत " यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले .

डॉ. सदानंद राऊत ( वर्ल्ड हेल्थ ऑरगॅनिझशन च्या सल्लागार समिती सदस्य, संस्थापक विघ्नहर हॉस्पिटल नारायणगाव, सर्पदंश विशेषग्य ) यांना सर्पदंश विषयात ३५ वर्षाचा अनुभव आहे , आजवर त्यांनी १२,००० पेक्षा जास्त रुग्णांना जीवनदान दिले आहे. त्यांनी जगभरातील २०,००० पेक्षा जास्त डोकरांचे प्रशिक्षण घेतले असून देशभरात ५०० पेक्षा जास्त प्रबोधन व्यख्यान केली आहेत.

सर्पदंश झाल्यानंतर कोणत्या सापाच्या दंशामुळे काय कोणती लक्षणे दिसून येतात तसेच त्यावेळी डॉक्टरांनी काय केले पाहिजे, सर्पदंश झाल्यावर प्रतिविषरोधी किती प्रमाणावर दिली पाहिजे आणि गंभीर परिस्थिती मध्ये रुग्णाची स्थिती काय असते व त्यावेळी कसे उपचार केले पाहिजेत याची माहिती डॉ. राऊत यांनी समजावून सांगितली.

                     वाय. सी.एम. चे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पाटील यांनी त्यांच्या १५ वर्षाच्या कार्यकाळात काय अनुभव आले आणि निरनिराळ्या परिस्थितीतून रुग्णांना कसे जीवनदान दिले याची माहिती दिली.

                  वर्ल्ड फॉर नेचर चे संस्थापक अध्यक्ष शुभम पांडे यांनी सापांची ओळख व आपल्या परिसरात आढळणारे विषारी साप यांची माहिती त्यांच्या व्याख्यानात दिली. तसेच सर्पमित्र व डॉक्टर यांनी नेहमी ज्ञानार्जन

करीत राहावे व आपल्या क्षेत्रात अष्टपैलू होऊन आपापल्या कार्यात भरीव योगदान द्यावे असा संदेश त्यांनी दिला.

                 या कार्यक्रमात वाय.सी.एम. चे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे तसेच पुणे, संगमनेर, ठाणे, अकोला, नगर, दौड, शिरूर, औरंगाबाद, यवतमाळ, चंद्रपूर, धुळे, सिल्लोड, नंदुरबार, जळगाव या जिल्यातील वन्यजीव संस्थाकानी सहभाग घेतला. कार्यक्रमात सहभागीतांनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post